पंतप्रधान निधीतून तरी मदत करा; डबेवाल्यांची भाजप नेत्यांना विनंती

 

माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - राज्यातील भाजप नेत्यांना डबेवाल्यांनी त्यांना मदत करण्याची विनंती केली आहे. आम्हाला पंतप्रधान निधीतून तरी मदत देण्यास भाग पाडा, असे आवाहनच डबेवाल्यांनी केले आहे. गेली १३० वर्ष मुंबईचे पोट भरणारा डबेवाला संकटात आहे. त्याच्या पोटाची चिंता महाराष्ट्र सरकार आणी भाजपने करावी व त्यांना मदत करावी, असे आवाहन भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई डबेवाला असोसिएशनने त्यांना मदत करण्याची विनंती भाजप नेत्यांकडे केली आहे

सुब्रह्मण्यम स्वामी महाराष्ट्र राज्य सरकारला आणि भाजपला सांगतात की डबेवाल्यांना मदत करा, पण प्रत्यक्षात भाजपचे नगरसेवक, आमदार, खासदार आणि भाजप पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री निधीला मदत न करता पंतप्रधान निधीला केली आहे, असे डबेवाल्यांनी सांगितले. डबेवाल्यांना मदत थेट पंतप्रधान निधीतून देण्यास भाग पाडा, म्हणजे डबेवाल्यांनाही वाटेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही डबेवाल्यांची काळजी आहे, अशी विनंती डबेवाल्यांनी केली. तसेच ‘आम्हाला आशा आहे की डबेवाल्यांसाठी मदत थेट केंद्रातुन येईल,’ असे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे अनेक लहान-मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. तर अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. डबेवाल्यांचीदेखील तीच अवस्था झाली आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी डबेवाल्यांना डबे पोहोचवण्याचे काम सुरू करता येत नाही. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून डबेवाले घरीच आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post