माय अहमदनगर वेब टीम
रायगड - महाड तालुक्यातील साळीवाडा नाका येथील हापूस तलावाजवळील पाच मजली इमारत कोसळली 47 नागरिक अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. महाड शहरातील काजळपुरा परिसरात निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे. या दुर्घटनेत किती जण जखमी झाले याचा आकडा अद्याप समजला नाही. ही दुर्घटना आज संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली असून बचावकार्य सुरु झाले आहे. कोसळलेल्या इमारतीचा मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे. या ढिगाऱ्याखाली कोणी नागरिक दाबले गेले आहेत का ? हे या दरम्यान कळेल.
महाड शहरातील साळीवाडा नाका येथील तारीक गार्डन हि पाच मजली इमारती साेमवारी सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास काेसळली. ढिगाऱ्याखाली सुमारे 200 नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफच्या तीन तुकड्या पुण्याहून महाडकडे रवाना झाल्या आहेत.
महाड शहरातील हापुस तलावाजवळ तारीक गार्डन हि इमारत उभारण्यात आली हाेती. इमारतीचे दाेन पिलर कमकुवत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या इमारतीमध्ये 47 फ्लॅट असल्याचे बाेलले जातय. या ठिकाणी सुमारे 200 नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाने मदत कार्य सुरु केले आहे. आतापर्यंत 17 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका, अग्नीशमन दल, पाेलिस, स्थानिक प्रशासन हजर आहे. त्यांनी मदत कार्य सुरु केले आहे. जखमींवर महाडच्या स्थानिक सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.दरम्यान, सदरची इमारत पाच वर्षापूर्वी बांधण्यात आली हाेती. तसेच मुंबईतील दाेन बांधकाम व्यावसायिकांनी इमारत बांधल्याचे बाेलले जातय.
Post a Comment