माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - केंद्र सरकारने २०२० च्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी निवड झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये राज्यातील एकमेव शिक्षकाला हा सन्मान मिळाला आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी येथील जिल्हा परिषद शिक्षक नारायण मंगलाराम यांना हा बहुमान देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने देशातील ३६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून राज्यांच्या शिफारसीनुसार १५३ शिक्षकांची निवड केली होती. त्यापैकी, ४७ शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील एकमेव शिक्षकाचा समावेश आहे. देशात लॉकडाऊन असल्याने ही निवड पद्धती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जाहीर करण्यात आली.
केंद्र सरकारने राज्य सरकारकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी नावांची यादी मागवली होती. त्यामध्ये, देशातील ३६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून १५३ शिक्षकांची निवड झाली होती. या १५३ शिक्षकांना ऑनलाईन पद्धतीने आपला प्रेझेंटेनश केंद्रीय निवड समितीसमोर सादर करायचे होते. त्यानुसार, गेल्या आठवड्यात या १५३ शिक्षकांनी केंद्रीय समितीसमोर आपले प्रेझेंटेशन सादर केले. त्यानंतर, २१ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील नारायण मंगलारम यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्याच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रातून केंद्रीय समितीकडे ६ नावांची यादी पाठविण्यात आली होती. या ६ शिक्षकांनी केंद्रीय निवड समितीसमोर आपले सादरीकरण केले. त्यामध्ये, गोपाळवाडीतील जिल्हा परिषद शिक्षक नारायण मंगलाराम यांची निवड झाली आहे. राज्य निवड समितीकडून निवड झालेल्या ५ जणांमध्ये वाशिम, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर, जळगाव आणि औरंगाबाद या ६ जिल्ह्यातील शिक्षकांची निवड करण्यात आली होती.
Post a Comment