माय अहमदनगर वेब टीम
हेेल्थ डेस्क - आपल्या शरीरात प्रोटीन असणे खूप गरजेचे आहे. प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस गळणे, नखांची झीज, त्वचा लाल होणे, जास्त भूख लागणे, वजन कमी होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. शरीराचे स्वास्थ टिकून राहण्यासाठी प्रोटीनची खूप गरज असते. प्रोटीनसाठी आपण मांसाहार तर करतोच मात्र त्यात फॅट जास्त असते. शरीराला प्रोटीन मिळवण्यासाठी मांसाहाराऐवजी आहारामध्ये काही ठराविक फळांचे सेवन केले तर शरीरास उपयुक्त प्रोटिन्स, अँटिऑक्सिडेंट्स, व्हीटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात मिळतील. जाणून घ्या प्रोटीनची मात्र अधिक असलेली फळे व त्यांचे फायदे –
पेरू
पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर तसेच अँटिऑक्सिडेंट्स गुणधर्मही असतात. १०० ग्रॅम पेरू खाल्ल्याने २.६ ग्रॅम प्रोटीन आपल्या शरीरास मिळत. त्याचबरोबर पोटही साफ राहते म्हणून पेरू हे फळ खायलाच पाहिजे.
पिकलेले फणस
फणसमध्ये व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे मेटॅबॉलिझम उत्तमप्रकारे घडून येते. त्याचप्रकारे १०० ग्रॅम फणसामध्ये १.८ ग्रॅम प्रोटीन असते म्हणून फणस खाल्ल्यानेही तुम्हाला प्रोटीन मिळते.
मनुके
मनुक्यांमध्ये लोह, फायबर, मॅग्नेशियम, कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. तसेच ३.३९ ग्रॅम प्रोटीन तुमच्या शरीरास मिळते यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. रिफाईंड शुगर ऐवजी मनुक्यांचे सेवन केले पाहिजेत.
ऍप्रिकॉट/जरदाळू
व्हिटॅमिन A व व्हिटॅमिन C आणि पोटॅशिअमच्या अत्यल्प प्रमाणामुळे हाय ब्लडप्रेशर असलेल्यांना याचा बराच फायदा होतो. १ मिलीग्रॅम सोडियम आणि २५९ मिलीग्रॅम पोटॅशिअम असते म्हणून हे फळ नेहमी सेवन केले पाहिजे.
Post a Comment