माय अहमदनगर वेब टीम
ऊधमपूर (वृत्तसंस्था) - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जगविख्यात वैष्णवी देवीची यात्रा खंडित करण्यात आली होती. मात्र, आता १६ ऑगस्टपासून ही यात्रा सुरू करण्यात येणार आहे. कोरोना संदर्भात लागू करण्यात आलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत ही यात्रा सुरू होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
वैष्णवी देवी मंदिराकडे दररोज जास्तीत जास्त पाच हजार भाविक या यात्रेत सहभागी होऊन जाऊ शकतात. त्यामध्ये दुस-या राज्यातील जास्तीत जास्त ५०० भाविकांचा समावेश असेल, मंदिर गाभा-यात व परिसरात एकावेळी ६०० पेक्षा जास्त भाविकांना एकत्र येण्याची परवानगी नसेल. सरकारने राज्यातील धार्मिक स्थळ खुली करण्यासंदर्भात निर्णय जारी केला.
यामध्ये कोरोनासंदर्भात आवश्यक ती योग्य उपाययोजना ही प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातले धार्मिक स्थळ खुली करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार जम्मू काश्मीर राज्यातील वैष्णवी देवी, चरार ए शरीफ, नंगाली साहिब, शाहदरा शरीफ, शिवखौड़ी ही धार्मिक स्थळे ही सुरू होतील.
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे राज्य कार्यकारी समितीचे सदस्य सचिव संदीप म्हणाले, की जिल्हा न्यायाधीश या धार्मिक स्थळांना घालून दिलेल्या नियमावलीची अंमलबजावणी करून घेतील. तसेच त्यांच्याकडे कोरोना संदर्भात योग्य परिस्थिती नसल्याचे आढळल्यास मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकारही असतील. नोंदणी न केल्यास कोणत्याही भाविकास वैष्णोदेवी यात्रेला जाता येणार नाही.
वैष्णोदेवी यात्रेसाठी लागू करण्यात आलेली नियमावली वैष्णवी देवी मंदिर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा न्यायाधीश यांना लागू करावी लागणार आहे. दरम्यान ३० सप्टेंबरपर्यंत ५००० भाविक येण्यास परवानगी असेल दुस-याराज्यातून येणा-या भाविकांना कोरोना टेस्ट घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे अनिवार्य असेल.
Post a Comment