माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला व तीन तालुक्यातील 23 गावातील हजारो शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्न असलेल्या के.के. रेंजसंदर्भात दिल्ली येथे आज संरक्षण मंत्र्यांची भाजप शिष्टमंडळाने खासदार डॉ सुजय विखे, माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी भेट घेतली.
दोनच दिवसांपूर्वी राहुरी व पारनेर तालुक्यातील काही गावांमध्ये सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यामुळे अस्वस्थ झालेल्या हजारो शेतकऱ्यांच्या भावना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या कानावर घातल्या. मुळा धरण, कृषी विद्यापीठ नगर मनमाड हायवे इत्यादी अनेक प्रकल्पांमुळे राहुरी येथील जमिनी मोठ्या प्रमाणावर अधिग्रहीत करण्यात आले आहेत.
ब्रिटिश कालीन असलेल्या के. के. रेंज साठी यापूर्वीच 1946 आणि 1956 मध्ये भूसंपादन झालेले असताना लष्कराच्या सरावासाठी अतिरिक्त एक लाख एकर जमिनीचे रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. सन 1980 सालापासून याबाबतची अधिसूचना दर पाच वर्षांनी प्रसिद्ध केली जाते. मात्र सुमारे चाळीस वर्षापर्यंत शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा नुकसान भरपाई दिली गेली नाही. केंद्र सरकारने विविध शहरात लष्कराची जमीन राज्य सरकारला यापूर्वीच हस्तांतरित केलेली असल्यामुळे राज्यसरकारने ह्याबाबत भूमिका घेणे आवश्यक आहे.
खासदार सुजय विखे यांनी यापूर्वी देखील के. के. रेंज संदर्भात लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. संरक्षण मंत्र्यांनी राज्य सरकारशी समन्वय साधत तोडगा काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. सुजित झावरे, राहुल शिंदे उपस्थित होते.
Post a Comment