बेंगळुरू - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवारी करोना पॉझिटिव्ह आढळून आले. यानंतर आता कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पाही करोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झालेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी ट्विट करून ही माहिती दिली. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांनी ट्विट केले. आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आढळून आलीय आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होत आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि स्वतःला सेल्फ क्वारंटाइन करावं, असं येडियुरप्पा यांनी ट्विटध्ये म्हटलंय.
उत्तर प्रदेशातील भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंहही रविवारी करोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यासर्वांना क्वारंटाइन होण्यासह करोना चाचणी करण्याची सूचना केली आहे. त्यापूर्वी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहितही यांचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. येडियुरप्पा यांच्या आधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही करोना पॉझिटिव्ह आढळून आलेत.
Post a Comment