शरीराला होतील ‘हे’ १० फायदे, जाणून घ्या



माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - मनुके हे सुकामेवा म्हणून विविध पदार्थांमध्ये वापरले जातात. द्राक्षांपासून तयार होत असलेल्या मनुक्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने विविध आजारांवर ते अतिशय गुणकारी आहेत. आयुर्वेदातही मनुक्यांचे महत्व दिसून येते. सर्दी-पडसे, खोकला आणि कफ दूर करण्यासाठी हे एक चांगले औषध आहे. मनुके आणि मध एकत्र खाल्ल्यास अनेक फायदे होतात. दोन्हींमध्ये आयर्न, कॅल्शियमसारखी अनेक पोषकतत्व असल्याने विविध आजारावर ते लाभदायक आहे.

असे का मनुके –
मनुके रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी यामध्ये मध मिसळून खावेत. एका सामान्य व्यक्तीने दिवसातून पाच मनुके खावे. वय, वजन, आजारांनुसार मनुक्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते.

हे आहेत फायदे

१) यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. त्वचा, केस निरोगी होतात.

२) शरीरातील विषारी घटक दूर होतात. किडनी, लिव्हरच्या समस्येत उपयोगी आहे.

३) यातील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

४) यातील अँटीऑक्सीडेंट कँसरपासून बचाव करतात.

५) यातील बीटा केरोटीनमुळे डोळे निरोगी राहतात. मोतीबिंदू होत नाही.

६) बॅड कोलेस्टेरॉल कमी होतात. हृदयरोगापासून बचाव होतो.

७) यातील फायबरमुळे पचन चांगले होते. बद्धकोष्ठता होत नाही.

८) या दोन्हीमध्ये आयर्न असल्याने रक्ताची कमतरता दूर होते.

९) यातील अँटी बॅक्टेरियल गुणामुळे तारूण्यपिटीका दूर होतात.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post