माय अहमदनगर वेब टीम
श्रीरामपूर - तीन चाकी सरकार चालविण्यासाठी अतिशय काळजी घ्यावी लागते. पाच मिनीटे तीन चाकी रिक्षा चालवून मी स्वतः अनुभव घेतला. अनेक गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते. वेगावर नियंत्रण ठेवून सर्व पहावे लागते. मला माहित नाही. राज्यातील तीन पक्षांचे सरकार किती दिवस टिकेल. तीन चाकी सरकारमध्ये बसलेले लोक घाबरलेले आहेत, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली.
श्रीरामपूर येथील करोना तपासणी केंद्राचा शुभारंभासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील श्रीरामपुरात आले होते. उद्घाटनानंतर त्यांनी संपर्क कार्यालयापासुन मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या कार्यालयातपर्यंत तीन चाकी रिक्षा चालवून राज्यातील तीन पक्षाच्या सरकारवर टीका केली.
Post a Comment