माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या माल व प्रवासी वाहतूकदारांना मोटार वाहन करात ५० टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो वाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात २५ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून राज्यभरातील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. केवळ अत्यावश्यक वाहनांना प्रवासाची मुभा देण्यात आली होती. त्या नंतर टप्प्याटप्याने इतर वाहनांना परवानगी देण्यात आली. मात्र, दोन महिन्यांच्या काळात असंख्य वाहने एकाच जागी उभी होती. प्रवासी वाहतूक करणा-या वाहनांना पाच महिन्यांनी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे अनेक वाहतूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यांची वाहने दोन ते पाच महिने वापराविना आणि विना उत्पन्न उभीच होती. तर, आता वाहतुकीला परवानगी मिळाली असली तरीही अपेक्षित उत्पन्न प्राप्त होत नाही. त्यामुळे माल व प्रवासी वाहतूकदारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
वाहतूकदारांची ही आर्थिक कोंडी लक्षात घेऊन राज्य सरकारने वाहतूकदारांना पुढील एक वषार्साठी रोड टॅक्स माफ करावा यासह विविध मागण्या वाहतूकदारांनी राज्य सरकारकडे केल्या होत्या. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संबंधित संघटनांकडून देण्यात आला होता. या सवार्ची दखल घेत राज्य सरकारने आता वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी ५० टक्के मोटार वाहन कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या सवलतीसाठी पात्र कोण असणार याचा तपशीलही देण्यात आला आहे.
Post a Comment