माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगरचे पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांची अवघ्या सहाच महिन्यात बदली करण्यात आली आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना नगरला नियुक्ती देण्यात आली आहे. या बडल्याचे आदेश काल गुरुवारी रात्री उशिरा गृहविभागाच्या वतीने काढण्यात आले.
नगर जिल्हयात या अगोदर पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांची अवघ्या नऊ महिन्यात बदली झाली होती, तर सर्वात कमी काळात म्हणजेच अवघ्या सहा महिन्यात अखिलशकुमार सिंह यांची बदली झाली आहे. अखिलेश कुमार सिंह हे नगरला अल्प काळ राहिले. त्यांनी एप्रिलमध्ये नगरचा पदभार घेतला होता. त्यांचा सर्व काळ लाॅकडाऊन व कोरोनाचा बंदोबस्त अशा कारणांसाठीच गेला. या काळात काही अपवाद वगळता मोठ्या गुन्हेगारीच्या घटना घटना घडल्या नाहीत.
Post a Comment