माय अहमदनगर वेब टीम
शिर्डी - अधिवेशनाची औपचारिकता पूर्ण करण्याचा घाट घातला आहे. सरकार नावाची कोणतीच व्यवस्था राज्यात नाही. महाविकास आघाडी सरकार म्हणजे फक्त इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असल्याची टीका आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
अधिवेशनाला रवाना होताना शिर्डी येथे माध्यमांशी संवाद साधला.कोव्हिडची टेस्ट करूनच आपण अधिवेशनाला जात असल्याचे स्पष्ट करून आ.विखे पाटील म्हणाले की करोनाच्या संकटात सरकार फक्त अधिकार्यांच्या भरवशावर राहिले.
जम्बो हॉस्पिटलच्या घोषणा केल्या प्रत्यक्षात कोणतीही सुविधा या कोव्हिड रुग्णालयात नाही.शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयातील स्टाफच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून त्यांनी सांगितले की, जीवावर उदार होऊन रात्रंदिवस नर्सिंग स्टाफ काम करत आहे.मात्र त्यांना कोणतेही संरक्षण नाही उलट त्यांच्या वेतनात कपात करण्याचे निर्णय होतात हे व्यवस्थेचे दुर्दैव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातही फारशी वेगळी परीस्थिती नाही.तीन तीन मंत्री संस्थानिक असूनही एकानेही कोव्हिड रुग्णालय उभारण्यासाठी पुढाकार घेतला नाही.या सरकारच्या केवळ घोषणा आहेत.
महाविकास आघाडी सरकार केवळ इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असून तीन पक्षात मोठी अस्वस्था असल्याने त्याचे पडसाद उमटू नयेत म्हणूनच दोन दिवसांच्या अधिवेशनाची औपचारिकता पूर्ण करण्याचा सरकारने घाट घातला. अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी विविध प्रश्नांच्या संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Post a Comment