फ्लॅट फोडून चोरट्यांनी चोरली मोठी रक्कम



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - भिंगारमधील नागरदेवळे परिसरात दुपारी पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छोटू मुळजी पाटोळे ( वय- 47 रा. नागरदेवळे, भिंगार ) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचा नागरदेवळे परिसरातील माधवबाग अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. फिर्यादी नोकरीला असल्याने ते ड्यूटीवर गेले होते. त्यांच्या घरातील इतर सदस्य देखील बाहेरगावी गेले होते. यामुळे फ्लॅटला कुलूप होती.

दुपारच्या वेळी चोरट्यांनी फ्लॅटचा सेफ्टी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. फिर्यादी यांच्या घरातील कपाटामध्ये असलेली सोन्याची चैन, अंगठी, मंगळसूत्र, कानातले व पाच हजार 200 रूपये रोख रक्कम असा 37 हजार 200 रूपयांचा ऐवज लंपास केला.

फिर्यादी ड्यूटीवरून घरी परतल्यानंतर घरामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक गोरे करीत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post