नगर जिल्ह्यातील करोना रूग्णसंख्या 25 हजार पार


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 84.18 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 899 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 3606 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 234, अँटीजेन चाचणीत 380 आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 285 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 53, संगमनेर 96, पाथर्डी 04, श्रीगोंदा 20, अकोले 03, राहुरी 22, शेवगाव 01, कोपरगाव 10, जामखेड 04, मिलिटरी हॉस्पिटल 20 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 380 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा 61 संगमनेर 14, राहाता 42, पाथर्डी 33, नगर ग्रामीण 06, श्रीरामपूर 16, कँटोन्मेंट 07, नेवासा 39, श्रीगोंदा 26, पारनेर 17, अकोले 24, राहुरी 18, शेवगाव 11, कोपरगाव 33, जामखेड 18 आणि कर्जत 15 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 285 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.

यामध्ये मनपा 139, संगमनेर 11, राहाता 18, पाथर्डी 06, नगर ग्रामीण 37, श्रीरामपुर 10, कॅन्टोन्मेंट 07, नेवासा 09, श्रीगोंदा 03, पारनेर 09, अकोले 07, राहुरी 14, शेवगाव 05, कोपरगांव 05, जामखेड 03 आणि कर्जत 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज 622 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा 178 संगमनेर 77 राहाता 36, पाथर्डी 31, नगर ग्रा.31, श्रीरामपूर 37, कँटोन्मेंट 05, नेवासा 19, श्रीगोंदा 37, पारनेर 19, अकोले 29, राहुरी 21, शेवगाव 03, कोपरगाव 50, जामखेड 32 कर्जत 14, मिलिटरी हॉस्पिटल 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post