नगरकरांनी जनता करू पुकारला तर सहकार्य करू - पालकमंत्री मुश्रीफ


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर -  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यू पुकारल्यास त्याला सहकार्य असेल. परंतु त्यामध्ये प्रशासनाचा कोणताही सहभाग नसेल, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. अहमदनगरमधील कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी ते आज अहमदनगर दौऱ्यावर होते. 

पालक मंत्री मुश्रीफ म्हणाले, "केंद्र सरकारने लॉकडाऊन न करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये लॉकडाउन होणार नाही. परंतु लोकांना कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जनता कर्फ्यू करता येईल. परंतु जनता कर्फ्यूमध्ये देखील मतभेद असू शकतील. त्याला शंभर टक्के जनतेकडून सहभाग मिळेल, असे नाही." जनता कर्फ्यू यशस्वी होण्यासाठी आपण पोलीस बंदोबस्त देऊ. परंतुु जनता दहा दिवस घरी राहून अकराव्या दिवशी बाजारपेठेत गर्दी करेल. त्यामुळे जे दहा दिवसात कमावलं ते एका दिवसात गमविले जाईल. त्यामुळे जनता कर्फ्यू कितपत यशस्वी होईल हे देखील अभ्यासले पाहिजे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, महापालिकेच्या आयुक्त श्रीकांत मायकलवार आदी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post