आमदार जगताप यांच्या मागणीला पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा प्रतिसाद



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : नगर जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामध्येच जिल्ह्यातील रेमेडिसीवर इंजेक्शनचा साठा संपल्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये होणाऱ्या इन्फेक्शनमुळे मृत्यू पावण्याची भीती मोठ्याप्रमाणात आहे. यासाठी रेमेडिसीवर इंजेक्शनची गरज भासते. मात्र या इंजेक्शनचा साठा कमी प्रमाणात आहे. यासाठी नातेवाईकांची धावपळ सतत सुरु असते. यामुळे खा. शरद पवार यांनी लगेच आ. संग्राम जगताप यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून माहिती घेऊन लगेच गरजूंसाठी ४८ रेमेडिसीवर इंजेक्शन तत्काळ पाठविली. नगर जिल्ह्यामध्ये रेमेडिसीवर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करुन देण्यासाठी खा. शरद पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी केली. केल्यानंतर सरकारने लगेच तत्काळ पुरवठा सुरु केला. हे इंजेक्शन सर्वसामान्य कोरोना रुग्णांना देण्यात येणार आहे. यासाठी अहमदनगर शहर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्याकडे सुपूर्त केले आहे. ते या क्षेत्रामध्ये चांगले काम करत असून, गरजूंपर्यंत हे इंजेक्शन पोहचवू शकतील, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

आ. संग्राम जगताप यांच्या सूचनेनुसार खा. शरद पवार यांच्यावतीने शहरातील गरजू कोरोना रुग्णांसाठी मोफत ४८ रेमेडिसीवर इंजेक्‍शन केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्याकडे सुपूर्त करताना आ. संग्राम जगताप. यावेळी नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, युवकचे अध्यक्ष अभिजित खोसे, वैभव ढाकणे, पराग झावरे, भुपेंद्र खेडकर, किरण रासकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना दत्ता गाडळकर म्हणाले की, मधल्या काळामध्ये कोरोना रुग्णांसाठी रेमेडिसीवर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्‍यता मोठ्या प्रमाणात होती. यासाठी आम्ही. आ. संग्राम जगताप यांच्याकडे सूचना केल्यानंतर त्यांनी लगेच सरकारचे लक्ष वेधले. व रेमेडिसीवर इंजेक्शनचा पुरवठा करावा, अशी मागणी केल्यानंतर सरकारने तत्काळ पुरवठा सुरु केला. तसेच आमच्यावर विश्‍वास ठेवून गरजूंना मोफत ४८ इंजेक्‍शन देण्यासाठी आमच्याकडे सुपूर्त केली. आम्ही त्यांच्या विश्वासाला पात्र राहून गरजूंनाच हे इंजेक्शन देऊन त्यांचे प्राण वाचवू, असे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post