राज्यात 19,218 नवे कोरोना रुग्ण, बळींचा आकडा 25,964, रिकव्हरी रेट 72.51%

 माय अहमदनगर वेब टीम

मुुंबई - राज्यात शुक्रवारीही रुग्णवाढीने नवा उच्चांक नोंदवला. दिवसभरात १९,२१८ नवे रुग्ण तर ३७८ मृत्यूंची नोंद करण्यात आली. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता ८ लाख ६३,०६२, तर बळींचा आकडा २५,९६४ वर गेला आहे. बुधवारी १३,२८९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. आता एकूण कोरोनामुक्तांची संख्या ६ लाख २५,७७३ वर गेली असून रिकव्हरी रेटही ७२.५१% इतका झाला आहे. राज्यात सध्या २ लाख १०,९७८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


मराठवाड्यात ३९ बळी, १७२३ नवे कोरोना रुग्ण

औरंगाबाद | मराठवाड्यात शुक्रवारी ३९ मृत्यू, १७२३ पॉझिटिव्ह आढळले. मराठवाड्यातील एकूण संख्या ६३,५५३ झाली. पैकी ४५,८४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी लातूर ९, उस्मानाबाद ७, नांदेड, परभणी व औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येकी ६ तर बीड जिल्ह्यात ५ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच लातूर ४१४, नांदेड ३६२, हिंगोली २७, जालना १६४, बीड ९५, उस्मानाबाद १२८, परभणी १२४ तर औरंगाबाद जिल्ह्यात ४०९ नवे रुग्ण आढळले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post