माय अहमदनगर वेब टीम
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी दिवसाची सुरुवात मृगशीर्ष नक्षत्रामध्ये होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून आज सिद्धी नावाचा योग जुळून येत आहे. त्यामुळे, 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस अनुकूल आणि उर्वरीत राशीच्या लोकांसाठी संमिश्र स्वरुपाचा ठरू शकतो.
येथे जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस
मेष: शुभ रंग : पांढरा | अंक : ४
कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. महत्वाच्या कामानिमित्त बरीच पायपीट होईल.
वृषभ: शुभ रंग : चॉकलेटी | अंक : ३
आज दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. काहींंना प्रवासाचे याेग अटळ आहेत. नव्या ओळखी होतील.
मिथुन : शुभ रंग : हिरवा| अंक : २
पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे.घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. वैवाहीक संबंधात गोडवा राहील. गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील.
कर्क : शुभ रंग : गुलाबी| अंक : ८
आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक क्लीष्ट कामेही सोपी होतील. उच्चशिक्षितांना सुयश.
सिंह : शुभ रंग : तांबडा|अंक : ७
नोकरदारांनी कामाशी प्रामाणिक रहाणे गरजेचे आहे.तरूणांनी व्सनसंपासून दूर रहाणे गरजेचे. कुसंगत टाळावी.
कन्या : शुभ रंग : सोनेरी|अंक : ९
मोठया आर्थिक उलाढाली टाळायला हव्यात. आज विश्वासू माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकेल.
तूळ : शुभ रंग : आकाशी | अंक : ४
वैवाहीक जिवनांत खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. आशादायी दिवस.
वृश्चिक : शुभ रंग : जांभळा | अंक : ६
सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावा. जिवलग मित्रांकडून आज अपेक्षित सहकार्य मिळेल.
धनू : शुभ रंग : जांभळा | अंक : ५
नोकरीत अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यनिष्ठेची दखल घेतली जाणार आहे.
मकर : शुभ रंग : पिस्ता | अंक : १
आज कामधंद्यातील काही अडचणी मानसिक स्वास्थ्य बिघडवतील. एकांत हवासा वाटेल. दैव साथ देईल.
कुंभ : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ३
कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहीणी आवडत्या छंदास वेळ देतील. विद्यार्थ्यांना सुयश.
मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : २
दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. आवक पुरेशी राहील. जागाविषयक प्रश्न सुटतील. कर्जप्रस्ताव मंजूर होऊ शकतील.
Post a Comment