अहमदनगर - नगर शहरातील या महामार्गांच्या दुरवस्थेबाबत महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देवून रस्ते दुरुस्ती न झाल्यास अधिकार्यांना काळे फासण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांच्या प्रमुख समस्येबाबत उठवलेल्या या आवाजाचे स्वागतच आहे. परंतु, त्याचवेळी नगर महानगरपालिका हद्दीत महापौरांच्याच अखत्यारित असलेल्या रस्त्यांची उडालेली दाणादाण गेल्या तीन महिन्यांपासून आपण पाहतच असाल. सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा देण्याची जी तत्परता आपण दाखवली तशीच तत्परता दाखवून महानगरपालिका प्रशासनालाही शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी असा इशारा आपण दिला पाहिजे. करोनाची परिस्थिती, नागरी सुविधा या गोष्टीत मनपा अपयशी ठरली असून शहरातील रस्त्यांची अवस्था ग्रामपंचायतीलाही लाजवणारी आहे.
असे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी म्हटलं आहे
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. शहरात एकही रस्ता चालण्यायोग्य राहिलेला नाही. या प्रश्नावर आज शिवसेनेन आक्रमक होत मनपा आयुक्तांना थेट शहरातील रस्त्यांवर पायी चालायला लावले. शहरातील रस्त्यांचा आँखो देखा हाल दाखवुन रस्त्यांचा कामांसाठी अल्टीमेटम दिला. शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह सेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.
ते म्हणाले, मागील दोन तीन महिन्यांपासून नगर शहरात रस्त्यांचे अस्तित्त्व केवळ नावापुरते राहिलेले आहे. एकही रस्ता वाहतूक योग्य राहिलेला नाही. महानगरपालिकेची यंत्रणा करोना परिस्थिती हाताळण्यात तर अपयशी झालेलीच आहे, त्याशिवाय शहरातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यातही अपयशी ठरली आहे. प्रशासनावर कोणाचा वचक राहिलेला नाही. शहरातील रस्त्यांबाबत आम्ही 'अहमदनगर स्पीक्स' या व्यासपीठाच्या माध्यमातून सर्वसामान्य नगरकरांना दररोज होणार्या त्रासाकडे लक्ष वेधले. महानगरपालिकेपेक्षा ग्रामपंचायत बरी अशा संतप्त प्रतिक्रिया नगरकरांमधून येत आहेत. असे असतानाही महानगरपालिकेने रस्त्यांच्या डागडुजीकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. महापालिकेत सत्ताधार्यांना या प्रश्नाचे देणेघेणेच नाही, अशी परिस्थिती आहे. खराब रस्त्यांच्या त्रासाला नगरची जनता आता वैतागली असून नगरकरांनी महापालिकेला काळे फासण्याआधी सत्ताधार्यांनी रस्त्यांची दुरवस्था संपुष्टात आणण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे, असे कळमकर यांनी म्हटलय.
Post a Comment