माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -शहराच्या फायनान्स कंपनी व बचत गट वाल्यांकडून होणारी पठाणी वसुली त्वरित थांबवण्यात मागणी साठी समाजवादी पार्टी अहमदनगर च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष अजीम राजे, महेश उमाप, मोबीन सय्यद, ओमकार केंद्रे, मुस्ताक शेख, मोहम्मद हुसेन, जीशान शेख, फहीम शेख, फुरकान कुरेशी, नदीम शेख, शाहरुख शेख, उमर शेख, जावेद शेख आदी.
अहमदनगर शहरात फायनान्स कंपन्या व महिला बचत गट त्यांच्याकडून होणारी पठाणी वसुली त्वरित थांबवण्यात यावी सध्या कोरोनाच्या प्रादुर्भाव अती वेगाने पसरत आहे तसेच बेरोजगारी व महामारी मुळे छोटे कुटुंब भीतीमध्ये जीवन जगत आहे लोकांना कामे नाही व्यवसाय बंद आहे गेल्या 4 महिन्यांपासूनछोटे मोठे व्यवहार बंद आहे अशा परिस्थितीत कर्ज फेडणे व बचत करणे उचित नाही सध्या महाराष्ट्रात पूर्णपणे लोक डाऊन उठवलेला नाही कोरोना चे फैलाव शहरात वेगाने पसरत आहे अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारची दयामाया न करता कर्ज वसूली करणारे फायनान्स कंपन्या व महिला बचत गट हे महिलांना भीती दाखवून आपली पठाणी वसुली करत आहे व महिलांना धमकावून सांगतात की जर हप्ता नाही दिले तर आपल्याला ब्लॉक करण्यात येईल व तुमच्या घरातील वस्तूउचलून नेणार शहरात महिलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्वरित फायनान्स कंपन्या व महिला बचत गट यांच्या कडून होणारी पठाणी वसुली थांबवण्यात यावी व ही वसुली नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून करण्यात यावीअशी मागणी समाजवादी पार्टी च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदनाद्वारे करण्यात आली ही पठाणी वसुली थांबली नाही तर समाजवादी पार्टीच्या वतीने वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पठाणी हिसका दाखवू असे निवेदनात म्हटले आहे.
Post a Comment