माय अहमदनगर वेब टीम
जीनिव्हा - देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 10 लाखापार गेली आहे. जगभरात 24 तासांत जेवढे रुग्ण पॉझिटिव्ह आढळतात, त्यापैकी 40 टक्के नवे रुग्ण भारतातील असल्याचा दावा जागतीक आरोग्य संघटनेने केला आहे.
अमेरिकेपेक्षा दुप्पट वेगाने भारतातील सक्रिय रुग्ण संख्या वाढत आहे. पहिले 5 लाख रुग्ण व्हायला 179 दिवस लागले. यानंतर 5 चे 10 लाख फक्त 51 दिवसांत झाले. देशात दररोज नव्याने 12 ते 15 हजार अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढते आहे. आजघडीला जगभरातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 13.68 टक्के अॅक्टिव्ह रुग्ण एकट्या भारतात आहेत.
भारतामध्ये विविध रुग्णालयांतून तसेच घरी मिळून 10 लाखांवर रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. बाकी 78.08 टक्के लोक बरे झालेले आहेत. 1.64 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधिक नवे रुग्ण आता भारतातच आढळून येत आहेत. अमेरिकेत सध्या भारतापेक्षा निम्मे रुग्ण म्हणजे दिवसाला 6 ते 7 हजार नवे रुग्ण आढळत आहेत.
Post a Comment