माय अहमदनगर वेब टीम
हेेल्थ डेस्क - चेहऱ्यावरील अनावश्यक केसांमुळे संपूर्ण चेहऱ्याचा लुक बिघडतो. हे केस काढण्यासाठी (Skin Care Tips) काही जणी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन भरपूर खर्च करतात. पण पार्लरमधील त्रासदायक ट्रीटमेंट करण्याऐवजी तुम्ही स्वयंपाकघरातील सामग्रींचा वापर करून चेहऱ्यावरील अनावश्यक केस कमी करू शकता. चेहऱ्यावरील केस दिसू नये, यासाठी काही जण ब्लीच सारख्या रासायनिक उत्पादनांचाही उपयोग करतात.
पण चेहऱ्यासाठी हे हानिकारक प्रकार करण्याची काहीच आवश्यकता नाही. तुम्हाला स्वयंपाकघरात तसंच फ्रीजमध्ये यासाठी काही -न्- काही उपयोगी नैसर्गिक सामग्री सापडतीलच. महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला जास्तीचा खर्च करावा लागणार नाही. तसंच घरगुती आणि नैसर्गिक उपचारांमुळे त्वचेवर दुष्परिणाम देखील होणार नाहीत. जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती
लिंबूचा रस
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असतं, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. याचा वापर करून तुमच्या त्वचेवरील काळपटपणा देखील दूर केला जाऊ शकतो. यासाठी एका वाटीमध्ये लिंबूचा रस पिळून घ्या, त्यात पाणी देखील मिक्स करा. यानंतर कापसाच्या मदतीने लिंबाचा रस चेहऱ्यावर लावा. जवळपास १५ मिनिटांपर्यंत हा रस चेहऱ्यावर राहू द्या आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. पण लिंबू रस कधीही थेट चेहऱ्यावर लावू नये. त्यापूर्वी आपल्या हातावर पॅच टेस्ट करून घ्यावी. थेट लिंबू किंवा लिंबाचा रस लावल्यास चेहऱ्यावर जळजळ होऊ शकते.
हळद
लिंबू रस, हळद आणि पाणी एकत्र घ्या. या सामग्रीपासून जाडसर पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा. या उपचारामुळे चेहऱ्यावरील केस कमी होण्यास बरीच मदत मिळेल. फेस पॅक तयार झाल्यानंतर कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांसाठी पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवावी. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय तुम्ही करू शकता. हे फेस पॅक वापरताना अंगावर जुने कपडे घाला, जेणेकरून डाग पडून कपडे खराब होण्याची भीती वाटणार नाही.
टोमॅट
लिंबूप्रमाणेच टोमॅटोमध्येही व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. लिंबू रस आणि टोमॅटोचा उपयोग करून जाडसर पेस्ट तयार करावी. या पेस्टमुळे आपल्या चेहऱ्यावरील अनावश्यक केस कमी करण्यासाठी मदत मिळते. चेहऱ्यावर ब्रशच्या मदतीने पेस्ट लावा. अंदाजे १५ मिनिटांसाठी पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवावी. थोड्या वेळाने थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून दोनदा हा उपाय तुम्ही करू शकता
बेसन
चेहऱ्यावरील केस कमी करण्यासाठी बेसन हा रामबाण उपाय आहे. बेसनमधील पोषण तत्त्वांमुळे चेहऱ्यावरील केस कमी होण्यास मदत मिळते. लहान बाळाच्या अंगावरील देखील अनावश्यक केस कमी करण्यासाठी आई, आजी बेसन लावून मसाज करते. आतापर्यंत हे तुम्ही अनेकदा पाहिले असेलच. बेसन पेस्ट तयार करण्यासाठी दोन मोठे चमचे बेसन, हळद आणि पाणी मिक्स करा. जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा तसंच मानेवरही लावा. लेप सुकल्यानंतर कोमट किंवा थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा. हलक्या हाताने चेहऱ्याचा मसाज करावा. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करून पाहा. काही दिवसांतच तुम्हाला आपल्या चेहऱ्यामध्ये बदल दिसतील.
Post a Comment