MIvsCSK : रायडु, डुप्लेसी चमकले; सीएसकेचा विजयारंभ

 

माय अहमदनगर वेब टीम

अबुधाबी - चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचे १६३ धावांचे आव्हान १९.२ षटकात ५ फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत आयपीएलच्या १३ व्या हंगामाचा विजयी आरंभ केला. सीएसकेकडून अंबाती रायडुने दमदार फलंदाजी करत ४८ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. त्याने फाफ डुप्लेसीच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची भागिदारी रचली. डुप्लेसीने नाबाद ५८ धावांची खेळी केली. दरम्यान, डावखुऱ्या सॅम कुरनने ६ चेंडूत १८ धावांची छोटी पण विजय सोपा करणारी खेळी केली. मुंबईचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने निराशा केली. त्याने ४ षटकात १० च्या सरासरीनी ४३ धावा दिल्या.  


मुंबई इंडियन्सच्या १६३ धावांच्या आव्हानचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली. पहिल्या दोन षटकात चेन्नईने आपले दोन्ही सलामीवीर गमावले. पहिल्या षटकात ट्रेंड बोल्टने शेन वॉट्सनला तर दुसऱ्या षटकात पॅटिसनने मुरली विजयला बाद केले. त्यामुळे चेन्नईची अवस्था २ षटकात २ बाद ६  धावा अशी झाली. दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर आलेल्या फाफ डुप्लिसिस आणि अंबाती रायडु यांनी चेन्नईला सावरण्यास सुरुवात केली. या दोघांनी ८ षटकात चेन्नईचे अर्थशतक धावफलकावर लावले.


दरम्यान, सेट झालेल्या रायडुने आपला धावांचा वेग वाढवत ३३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने डुप्लेसीने बॉल टू रन खेळत त्याच्यासोबत मोठी भागिदारी रचण्यास सुरुवात केली. या दोघांनी चेन्नईला १३ षटकात शतकाच्या जवळ पोहचवले. अर्थशतकानंतर रायडुने अधिक आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. पाठोपाठ डुप्लेसीनेही आपला धावांचा वेग वाढवला. या दोघांनी चेन्नईला  १६ षटकापर्यंत १२१ धावांपर्यंत मजल मारली होती. पण, फटकेबाजी करण्याच्या नादात ७१ धावांवर खेळणारा रायडु बाद झाला. आता चेन्नईला विजयांसाठी २४ चेंडूत ४२ धावांची गरज होती. त्यावेळी रविंद्र जडेजा फलंदाजीला आला. त्याच्या साथीला सेट झालेला डुप्लेसी होता. पण, कृणाल पांड्याने १० धावांवर खेळणाऱ्या जडेजाला पायचीत पकडे. जडेजा बाद झाल्यानंतर धोनी मैदानात येईल असे वाटले होते पण, धोनीने सॅम कुरनला फलंदाजीला पाठवले. त्याच्यामागे डावखुऱ्या कृणाल पांड्याला चोपण्यासाठी डावखुरा फलंदाजच पाहिजे हे इक्वेशन होते. कुरनने ही कृणाल पांड्याच्या षटकात एक षटकार आणि एक चौकार मारुन धोनीचा विश्वास सार्थ ठरवला. 


अखेरच्या १२ चेंडूत १६ धावांची गरज असताना कुरनने बुमराहला पहिल्याच चेंडूवर षटकार मारून गणित ११ चेंडूत १० धावा असे आणले पण, बुमराहने कुरनला बाद करत पुन्हा चेन्नईवर दबाव आणला. अखेर धोनी मैदानात उतरला. दरम्यान स्ट्रईकवर असलेल्या डुप्लेसीने बुमराहला अजून एक चौकार मारुन ९ चेंडूत ६ धावा या सोप्या स्थितीत सामना आणला. बुमराहने उरलेले चेंडूत एकच धाव दिल्याने आता चेन्नईला विजयासाठी अखेरच्या षटकात ५ धावांची गरज होती. डुप्लेसीने ट्रेंड बोल्टच्या पहिल्या दोन्ही चेंडूवर चौकार मारत सामना आरामात आपल्या खिशात टाकला.


संथ सुरुवात करणाऱ्या फाफने अखेरच्या षटकात आपली धावगती वाढवत ४४ चेंडूत ५८ धावांची नाबाद खेळी केली. तर अंबाती रायडुने ४८ चेंडूत ७१ धावांची तुफानी खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची दमदार भागिदागी रचली तेथेच चेन्नईने सामन्यावर पकड मिळवली.  


तत्पूर्वी, आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, खेळपट्टीवरील हिरवळ पाहून घेतलेला धोनीचा हा निर्णय मुंबई इंडियन्सच्या सलमीवीरांनी उलटा पाडला. कर्णधार रोहित शर्माच्या जोडीने सलामीला आलेल्या क्विंटन डिकॉकने चेन्नईच्या स्वैर माऱ्याचा चांगलाच समाचार घेत मुंबईला पहिल्या ४ षटकात ४५ धावांपर्यंत पोहचवले. 


सलामीची जोडी चेन्नईची चांगलीच धुलाई करणार असे वाटत असतानाच धोनीने चेंडू पियुष चावलाच्या हाती चेंडू दिला. त्याने कर्णधार रोहितला १२ धावांवर मागे धाडले. त्यानंतर पुढच्याच षटकात सॅम कुरनने २० चेंडूत ३३ धावा करणाऱ्या स्फोटक फलंदाज क्विंटन डिकॉकला बाद करत मुंबईला पाठोपाठ दुसरा धक्का दिला. त्यामुळे चेन्नई सामन्यात पुनरागमन केले असे वाटले. परंतु त्यानंतर आलेल्या सुर्यकुमार यादव आणि सौरभ तिवारी यांनी मुंबईची पडझड रोखली आणि धावफलक हालता ठेवला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भागिदारी रचत मुंबईला ११ षटकात ९० च्या पार पोहचवले. 


ही जोडी डोकेदुखी ठरत असतानाच धोनीने पुन्हा दिपक चाहरकडे चेंडू सोपवला. त्याने पहिल्या स्पेलमधे केलेल्या चुकांची सुधारणा करत सुर्यकुमारच्या रुपात चेन्नईला तिसरी विकेट मिळवून दिली. सुर्यकुमार बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने सलग दोन षटकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. दरम्यान, सेट झालेल्या सौरभ तिवारीनेही आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्याने ३१ चेंडूत ४२ धावांपर

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post