माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - सर्वोच न्यायलयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला सात दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे. सात दिवसात राज्य सरकारने मराठा आरक्षणा संर्दभात आद्यादेश काढला नाही तर अहमदनगर जिल्ह्यातील महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकराव गडाख , राज्य उच्चशिक्षित मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या घरावर महासंघाचे कार्यकर्ते मोर्चा काढुन सरकारचा निषेध करणार असल्याचे मराठा महासंघाचे महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख संभाजी दहातोंडे यानी आज अहमदनगर येथे बैठक घेऊन आंदोलनाची घोषणा केली.
मराठा आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा संघटनांनी 14 पासुन राज्य भर आंदोलन करण्यासाठी आज प्रत्येक जिल्ह्यातील संघाटनांनी बैठक आयोजित केली होती आज मराठा महासंघाने अहमदनगर येथे बैठक घेऊन आंदोलनाची घोषणा केली यावेळी संघटनेच्या तालुक्यातील पदाधिकार्याशी ऑनलाईन चर्चा करण्यात आली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना संभाजी दहातोंडे यांनी सांगितले की काल राज्य कार्यकारीनीची मुंबई येथे बैठक झाली मराठा आरक्षण संदर्भात प्रत्येक जिल्ह्यत बैठक घेण्याचा निर्णय झाला त्या नुसार आज अहमदनगर जिल्ह्यातील मोजक्या प्रतिनिधी सोबत सोशल डिस्टसिंग पालन करत बैकठ घेण्यात आली बैठकीत मराठा आरक्षणा संर्दभात आंदोलनाची भुमिका ठरली असुन आमच्या कोपर्डीच्या ताईची घटना घटली त्यानंतर हा मुद्दा पुढे आला मराठा आरक्षणा संर्दभात राज्य सरकारने कोर्टात योग्य भुमिका न मांडल्या मुळे हा प्रोब्लेम तयार झाला असुन राज्य सरकारने विशेष आधिवेशन बोलावुन आद्यादेश काढावा.
Post a Comment