कामगार केंद्र सरकार विरोधात आक्रमक ; कामगार कायद्याची होळी



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : कामगार हा देशाच्या जडणघडणीमधला महत्त्वाचा घटक आहे. कामगारा शिवाय उद्योग क्षेत्राला भरारी येणार नाही. कामगारांचे हक्क व कामगारांची चळवळ मोडीत काढण्यासाठी केंद्र सरकारने संसदेमध्ये पावसाळी अधिवेशनात कामगारविरोधी चुकीचा कायदा पारीत करुन मंजुर करुन घेतला आहे. या चुकीच्या निर्णयामुळे कामगारांचे मोठे नुकसान होणार आहे. या कायद्यामुळे कामगारांचे हक्क हिसकावून घेतले जाणार आहे. तसेच कामगार कायद्याची पायमल्ली होणार आहे. तरी केंद्र सरकारने कामगार कायद्यामध्ये घेतलेले निर्णय मागे घेण्यात यावे, अशी मागणी अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आली.

एमआयडीसी सह्याद्री चौक येथे केंद्र सरकारने कामगार कायद्याविरोधात घेतलेले निर्णय परत घ्या, अशी मागणी अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेने या कायद्याची होळी करत कामगारांनी निदर्शने केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे, दत्ता तापकिरे, किरण दाभाडे, निलेश हिंगे व कामगार वर्ग उपस्थित होता.


यावेळी बोलताना संतोष लांडे म्हणाले की, या विधेयकामध्ये ३00 पेक्षा कमी कर्मचारी संख्या असलेल्या कंपन्यांना कामगार कपातीस माेकळीक देन्याचे विधायक मंजूर केले याचबरोबर कामगारांच्या संपावर देखील मर्यादा येणार आहे. कामगारांना नोटीस दिल्याशिवाय संप पुकारता येणार नाही. या निर्णयामुळे कामगारांचे मोठे नुकसान होणार आहे. तरी हे कामगार विधेयक मागे घ्यावे, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु. कामगारांना कामगारांचे हक्क मिळवून देण्यासाठी अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्यावतीने केंद्र व राज्य सरकारकडे आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा करु, असे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post