माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - प्रोफेसर कॉलनी चौकातील भाजीबाजारामुळे व्यापारी वर्ग, रहिवासी आणि वाहतुकीमुळे नागरिकांना होणार्या त्रासापासून सुटका मिळावी, यासाठी आम्ही आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे निवेदनाद्वारे अर्ज केला होता.
त्यानंतर लगेच अतिक्रमण विभागाने कारवाई करुन प्रोफेसर कॉलनी चौकातील भाजीबाजार उठविण्यात आला. त्यानंतर काही दिवसांनी काही राजकीय पुढार्यांनी पुन्हा हा भाजीबाजार प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये बसावा, आंदोलने व स्ंटटबाजी करुन हा भाजीबाजार बसविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. तसेच भाजीवाले व फेरीवाले यांच्यामुळे व्यापारी व रहिवाशांना होणारी दादागिरी व गुंडगिरीमुळे त्रस्त झाले आहे. याच भाजीबाजारामुळे प्रोफेसर कॉलनी चौकाचे विद्रुपीकरण झाले आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. महापालिकेचा कोणावरही वचक नाही. आपली महापालिका आहे का ग्रामपंचायत, कोणी कुठेही मनमानी पद्धतीने बसत आहे. प्रोफेसर कॉलनी चौकातील गाळेधारक बँकेचे कर्ज प्रकरण करुन आपले व्यवसाय सुरु केले आहे. पण या भाजीबाजार व इतर अतिक्रमणामुळे त्यांच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. तरी भाजीवाल्यांना रस्त्यावर न बसविता महापालिकेने त्यांना चांगली जागा द्यावी.
प्रोफेसर कॉलनी परिसरामध्ये कुठल्याही भाजी विक्रेत्याला रस्त्यावर पुन्हा बसू देवू नये, भाजी विक्रेते हे अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचार्यांना शिवीगाळ करत असतात. तरी या विषयीचे राजकीय भांडवल होऊ नये, नाही तर नागरिकांना योग्य न्याय मिळणार नाही. अशी भीती वाटते. छोट्या-मोठ्या राजकीय व्यक्तींनी या विषयात लक्ष घातल्यामुळे मुख्य विषय बाजूला पडून येथील रहिवासी आणि व्यापारी वर्गाला मानसिक त्रास व आर्थिक नुकसान भोगावे लागत आहे. आयुक्त मायकलवार यांना व्यापारी व नागरिकांची विनंती आहे की, लवकरात लवकर या विषयावर योग्य कारवाई करून रहिवासी व व्यापारी वर्गाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी प्रोफेसर कॉलनी व परिसरातील नागरिक व व्यापार्यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी विवेक वाडेकर, अशोक जोशी, राजु मुरकुटे, सुयश अवसरकर, सूर्यप्रकाश राठोड, प्रसन्न एखे, बाळू दराडे, अब्दुल रहिमान शेख, सागर भांड, प्रकाश जोशी, दीपक आगे, प्रशांत वाघ यांनी केली.
Post a Comment