हे आहेत ; आदर्श शिक्षक पुरस्कारचे मानकरी

 

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे  देण्यात येणारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज गुरूवारी मान्यता दिली. यामुळे जिल्ह्यातील १४ प्राथमिक शिक्षकांना लवकरच पुरस्कार दिले जाणार आहेत.

पुरस्कार जाहीर झालेल्यामध्ये अकोले स्मिता घनवटे (कळस बु, संगमनेर), सुशिला धुमाळ (मिझापूर, कोपरगाव), नवनाथ सूर्यवंशी (हरीसन ब्राँच, राहाता), वैशाली सोनवणे (ममदापूर मराठी शाळा, श्रीरामपूर), शोभा शेंडगे (फत्याबाद, राहुरी), दत्तात्रय नरवडे (वांबोरी स्टेशन, नगर), जयश्री घोलप (शिंदेवाडी, पारनेर), मिनल शेळके (बगेवाडी, श्रीगोंदा), शोभा कोकाटे (गोपाळवाडी, नेवासा), रेवनाथ पवार (विधाते वस्ती, शेवगाव), जयराम देवडे (चेडेचांदगाव, पाथर्डी), बेग आरिफ युसूफ (नांदूर निबांदैत्य, कर्जत), विजयकुमार राऊत (नागवलवाडी) आणि जामखेड मुकूंदराव सातपुते (वाकी) यांचा सामवेश आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post