माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - तब्बल १७ खासदार कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जे खासदार कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामध्ये मीनाक्षी लेखी, अनंतकुमार हेगडे, परवेश साहिब सिंग यांचा समावेश आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. कोरोना काळात होणार्या या अधिवेशनात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडणार आहेत.
या अनुषंगाने वेगवेगळी व्यवस्थाही करण्यात येत आहे. सरकारकडून एकूण 23 विधेयके अधिवेशनादरम्यान सादर करण्यात येणार आहेत. त्यापैकी 11 हे अध्यादेश आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळात सरकारने काही निर्णय लागू करण्यासाठी अध्यादेश काढले होते.
दरम्यान, देशातील कोरोनामुक्तीचा दर सोमवारी ७८ टक्के एवढा नोंदवण्यात आला. दिलासादायक बाब म्हणजे केवळ २०.४०% सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात, घरगुती विलगिकरणात उपचार सुरु आहेत. गेल्या एका दिवसात देशभरात ९२ हजार ७१ कोरोनाग्रस्तांची भर पडली. तर, १ हजार १३९ रुग्णांचा मृत्यू झाला.
दिलासादायक बाब म्हणजे ७७ हजार ५१२ कोरोनामुक्त रुग्णांना विविध रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे ४८ लाख ४६ हजार ४२७ एवढी झाली आहे. यातील ३७ लाख ८० हजार १०७ रुग्ण कोरोनातून पुर्णत: बरे झाले आहेत. तर, ९ लाख ८६ हजार ५९८ कोरोनाग्रस्तांवर (२०.३६%) उपचार सुरु आहेत. दुदैवाने आतापर्यंत ७९ हजार ७२२ रुग्णांचा (१.६४%) कोरोनाने बळी घेतला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार गेल्या एका दिवसात सर्वाधिक कोरोनाप्रभावित महाराष्ट्रात २२ हजार ५४३ कोरोनाबाधित आढळले. महाराष्ट्रासह कर्नाटक (९,८९४), आंधप्रदेश (९,५३६), उत्तर प्रदेश (६,२०५), तामिळनाडू (५,६९३), दिल्ली (४,२३५), तसेच ओडिशामध्ये (३,९१३) सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद घेण्यात आली.
गेल्या चोवीस तासात झालेल्या एकूण कोरोनामृत्यूपैकी ५३ टक्के मृत्यू केवळ ३ राज्यात झाले आहेत. महाराष्ट्रात ३६.६%, कर्नाटकमध्ये ९.२% तर,उत्तरप्रदेशात ७% मृत्यू नोंदवण्यात आले. उर्वरित राज्यांमध्ये ४७.२% टक्के मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येपैकी ६० टक्के रुग्णांची पाच राज्यात नोंद घेण्यात आली आहे. महाराष्ट्रात रविवारी दिवसभरात २१.९% , आंधप्रदेश ११.७% , तामिळनाडू १०.४%, कर्नाटक ९.५% तसेच उत्तर प्रदेशात ६.४% कोरोनाबाधित आढळले.
देशात आतापर्यंत ५ कोटी ७२ लाख ३९ हजार ४२८ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ९ लाख ७८ हजार ५०० कोरोना तपासण्या या रविवारी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे
Post a Comment