माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ नगर तालुका यांच्या वतीने शहरातील स्थानिक वृत्त वाहिनीचे संपादक आफताब शेख यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अॅड. गजानन फुंदे यांच्या हस्ते शेख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अहमदनगर येथील कै. दादा पाटील शेळके बाजार समितीच्या सभागृहात मध्ये फिजीकल डिस्टन्ससह सर्व नियम पाळून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे मोहन बोरसे, नगर तालुका पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंह राजपूत, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे उपस्थित होते.
कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधिकारी यांना गौरविण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला. पोलीस निरीक्षक मोरे म्हणाले की, पोलीस आणि पत्रकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, कोरोना काळात पत्रकारांनीही उत्तम कामगिरी केलेली आहे. नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे आज पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले असून, यामुळे पुरस्कार्थींना नक्कीच काम करण्यास प्रेरणा मिळेल. त्याचबरोबर कोरोना काळात सर्वांनी शासनाचे नियम पाळून स्वतःची काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी नगर शहर अध्यक्ष भारत पवार, नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे नगर तालुकाध्यक्ष तुकाराम कामठे, जिल्हा खजिनदार अन्सार शेख, नगर तालुका उपाध्यक्ष खासेराव साबळे, रियाज पठाण, श्याम कांबळे, रफिक शेख, शिवा म्हस्के, साबील सय्यद, अशोक तांबे, रवी कदम, निलेश आगरकर आदि पत्रकार संघातील पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment