माय अहमदनगर वेब टीम
सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या घरात दोघांना कोरोनाचा संसगार्ची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. आर. आर. यांचा मुलगा रोहित पाटील आणि आबांचे भाऊ सुरेश पाटील या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर आमदार सुमन पाटील यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यात कोरोना साथीचा संसर्ग वाढतच चालला आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, मोहनराव कदम, सदाभाऊ खोत, माजी आमदार संभाजीराव पवार, काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांनी कोरोनाचा सामना केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत आर. आर. पाटील यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
Post a Comment