माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2020 या काळात संपूर्ण जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यात येईल अशी माहिती समन्वयक किरण काळे व कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली आहे .
युवक काँग्रेसने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासन व स्थानिक संस्था प्रभावीपणे काम करत आहे. युवक काँग्रेसने ही सातत्याने सॅनिटायझर व मास्क चे वाटप करत कोरोना काळात नागरिकांना मदत केली आहे. सत्यजित तांबे यांचा वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान वाडी-वस्तीवर व घरोघरी राबवण्यात येणार असून या अंतर्गत प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये त्या व्यक्तीचे ऑक्सिजनचे प्रमाण तसेच शरीराचे तापमान तपासले जाणार आहे. या समवेत कोरोणा चा वाढता प्रादुर्भाव रोखणे व रुग्ण संख्या नियंत्रित करणे तसेच प्रत्येक व्यक्तीला आरोग्याबाबतची शिक्षण देऊन कोरोना पासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी ही प्रबोधन करण्यात येणार आहे .
याकामी प्रत्येक तालुक्यातील युवक काँग्रेसच्या वतीने हे अभियान घरोघर राबवले जाणार असून आठ दिवसांमध्ये कोरोणा मुक्तीसाठी युवक काँग्रेस अधिक सक्रिय होणार असल्याची माहिती काळे व दिवटे यांनी दिली आहे या समवेत रक्तदान शिबिर ,वृक्षारोपण, कोरोणा रोखण्यासाठी विविध योजनाही राबवल्या जाणार आहेत
Post a Comment