माय अहमदनगर वेब टीम
काेराेनावर बहुप्रतिक्षेत असलेली लस ऑक्सफर्ड विद्यापीठ विकसित करत असून त्याचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करणार आहे. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीस सोमवारपासून पुण्यातील ससून रुग्णालयात सुरुवात हाेणार आहे. ससून रुग्णालयाने त्यादृष्टीने लसची चाचणी करण्यासाठी स्वयंसेवकांना नावनाेंदणी करण्यास सांगितले आहे.
ससूनचे अधिष्ठता डाॅ.मुरलीधर तांबे यांनी सांगितले की, पुढील आठवडयापासून आॅक्सफर्ड विद्यापीठ आणि सीरम इन्स्टिट्यूट यांची ‘काेव्हिशील्ड’ या काेराेनावरील लसची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी साेमवारपासून सुरू करण्यात येईल. यासाठी काही स्वयंसेवक पुढे आले असून सुमारे १५० ते २०० स्वयंसेवकांना या लसीचा डाेस देण्यात येणार आहे.
Post a Comment