ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन,

 


माय अहमदनगर वेब टीम

सातारा - ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. सातारा येथील फलटण तालुक्यात 'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. प्रकृती बिघडल्यानंतर आशालता यांना 16 सप्टेंबर रोजी वाई येथील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आशालता वाबगावकर यांची ऑक्सिजन लेव्हल कमी जास्त होत होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.


साताऱ्याजवळ असलेल्या वाई जवळच्या हिंगोली या गावात एका फार्म हाऊसमध्ये या मालिकेचे शुटिंग सुरू होे. आशालता या गेली काही दिवस या शुटिंगसाठी तिथेच होत्या. या मालिकेत एका गाण्याचे शुटिंग सुरू होते. तिथे मुंबईवरून काही कलाकारांचा ग्रुप आला होता. त्याच वेळी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post