जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

 



माय अहमदनगर वेब टीम

बुधवार 16 सप्टेंबरला मघा नक्षत्र असल्यामुळे सिद्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या आठ राशीचे लोक नोकरी आणि बिझनेसमध्ये भाग्यशाली राहतील. बुधवारचे ग्रह-तारे या राशीच्या फेव्हरमध्ये राहतील. या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...


मेष: शुभ रंग : पांढरा | अंक : ६

आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक क्लीष्ट कामेही सोपी होतील. सुसंधी चालून येतील.


वृषभ: शुभ रंग : सोनेरी | अंक : ५

कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. काही महत्वाच्या कामानिमित्त बरीच पायपीट होण्याची शक्यता आहे. काही बिले भरावी लागतील.


मिथुन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : १

सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावा. जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.कर्जप्रस्ताव मंजूर होऊ शकतील. हितशत्रू पळ काढतील.


कर्क : शुभ रंग : चंदेरी | अंक : ८

नोकरीत अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यनिष्ठेची दखल घेतली जाईल. छान दिवस.


सिंह :शुभ रंग : आकाशी|अंक : २

घरात वडीलधारी मंडळी त्यांची मते तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतील. आज एकांत हवासा वाटेल.


कन्या : शुभ रंग : हिरवा|अंक : ३

मोठया आर्थिक उलाढाली उद्यावर ढकलणे हिताचे. दूरच्या प्रवासात सावध रहा. मौल्यवान वस्तू सांभाळा.


तूळ : शुभ रंग : शुभ रंग : राखाडी|अंक : ५

वैवाहीक जिवनांत खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. आशादायी दिवस.


वृश्चिक : शुभ रंग : जांभळा|अंक : ४

कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरूणांनी व्सनसंपासून दूर रहाणे गरजेचे आहे. कुसंगत टाळावी.


धनु : शुभ रंग : तांबडा|अंक : ९

कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहीणी आवडत्या छंदास वेळ देतील. विद्यार्थ्यांना सुयश.


मकर : शुभ रंग : भगवा|अंक : ७

आज दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. आवक पुरेशी राहील. प्रेमप्रकरणांत मात्र नसती आफत होईल.


कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ६

आज दिवस धावपळीत जाईल. काहींंना प्रवासाचे याेग अटळ आहेत. व्यवसायात भागिदारांशी एकमत राहील.


मीन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८

पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे.घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post