जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस

माय अहमदनगर वेब टीम

9 सप्टेंबर बुधवारच्या तिथी, वार आणि नक्षत्राच्या संगयोगाने सर्वार्थसिद्धी योग जाणून येत आहे. यासोबत सिद्धी नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. आजच्या या शुभ योगांच्या प्रभावामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस शुभफळ देणारा राहील. कामातील अडथळे दूर होईल. जॉब आणि बिझनेसमध्ये नशिबाची मदत मिळेल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस...


मेष : शुभ रंग : तपकिरी | अंक : १

मन चंचल राहील. काम कमी व धावपळ जास्त होईल. हातचे सोडून मृगजळामागे धावायचा मोह होईल.


वृषभ: शुभ रंग : चंदेरी | अंक : ३

पैसा येण्याइतकेच पैसा जाण्याचेही मार्ग प्रशस्त असतील. चैनी वृत्तीस थोडा लगाम घालणे गरजेचे आहे. कुसंगतीने प्रतिष्ठा धोक्यात येईल. सतर्क राहा.


मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : २

योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांचे चीज होईल. व्यवसायात आवक मनाजोगती असेल. पैशाअभावी रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मित्रमंडळीत मोठेपणा मिळेल.


कर्क : शुभ रंग : सोनेरी | अंक : ४

अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. आज नाकासमोर चालणेच हिताचे राहील. मित्रांच्या नादी लागूच नका.


सिंह : शुभ रंग : तांबडा|अंक : ५

कार्यक्षेत्रात महत्त्वपूर्ण निर्णय घेताना अनुभवी मंडळींचा सल्ला घेणे खूप गरजेचे राहील. दैवाची साथ राहील.


कन्या : शुभ रंग : भगवा|अंक : ८

भागीदारी व्यवसायात काही तीव्र स्वरूपाचे मतभेद होऊ शकतात. आज देण्याघेण्यात पारदर्शकता ठेवा.


तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ६

काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. चांगली वैचारिक देवाणघेवाण होईल. विचार प्रगल्भ होतील.


वृश्चिक : शुभ रंग : निळा|अंक : ७

आज कष्टाच्या प्रमाणात मोबदला कमीच असला तरी तुमचा कामात उत्साह दांडगा असेल. आशादायी दिवस.


धनु : शुभ रंग : आकाशी|अंक : ९

कामावर दांडी मारून थोडे करमणुकीस प्राधान्य द्यावेसे वाटेल. प्रेमप्रकरणांना आज ग्रीन सिग्नल आहे.


मकर : शुभ रंग : जांभळा|अंक : २

सामाजिक कार्यात तुमचा मानसन्मान वाढेल. आज एखाद्या घरगुती समारंभात हजेरी लावावी लागेल.


कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३

आज तुम्हाला एखादी गुप्त बातमी समजेल.गृहिणींनी झाकली मूठ झाकलेलीच ठेवणे गरजेचे आहे.


मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : १

भाग्योदयाकडे वाटचाल होईल. विरोधकांचा विरोध गोड बोलूनच थोपवून धरता येईल. वास्तवाचे भान ठेवा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post