मुंबई - मुंबई आणि महाराष्ट्राबाबत कोणी पाकिस्तान आणि अन्य काही उल्लेख करील तर त्याच्याशी आम्ही बिलकुल सहमत नाही. मात्र, कंगणा रानौतचे बांधकाम अनधिकृत होते तर एक महिन्यांपूर्वी, एक वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने का कारवाई केली नाही? असा सवाल करत पालिका आणि राज्य सरकारने आजची केलेली कारवाई ही सूड बुद्धीने केलेली कारवाई आहे, असे भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे. तर कंगनाच्या घराबाहेर एकत्र येत तिच्या चाहत्यांनीही बीएमसी आणि शिवेसेनेवर टीका केली.
मुंबईतील कार्यालयावर होत असलेल्या तोडफोडीच्या कारवाईला सुरुवात होत असताना कंगनानं शिवसेना आणि पालिकेवर टीकेची झोड उठवली. कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड झाल्यानंतर भाजपा नेते तिच्या समर्थनार्थ उतरले आहेत. भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका करताना, ही कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचे म्हटले. त्यानंतर, महिला कुस्तीपटू गीता फोगाटनेही ट्विट करुन कंगनाचे समर्थन केले आहे.
तसेच, शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीक केलीय. ‘ऐसा लग रहा जिसकी लाठी उसकी भैंस !! खैर कंगना राणावत का ऑफिस तोड सकते है हिम्मत नहीं’, असे ट्विट गीता फोगाटने केले आहे. तर, शिवाजी महाराजांनी महिलेला सन्मान देणं शिकवलं, पण हे लांडग्यासारखे कंगनाच्या मागे लागलेत, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर जबर प्रहार केला.
Post a Comment