माय अहमदनगर वेब टीम
औरंगाबाद - औरंगाबादच्या पोलिस आयुक्तपदी निखिल गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबादचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची बदली करत त्यांना नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून पाठविण्यात आले आहे.
पोलिस महासंचालक कार्यालयाने दुसऱ्या दिवशी पुन्हा काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. पहिल्या दिवशी औरंगाबादच्या एकाही पोलिस अधिकाऱ्याला बदलले नव्हते. परंतु, दुसऱ्या दिवशी थेट पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून पाठविण्यात आले असून त्यांच्या जागी केंद्रीय सेवेतून परतलेले निखिल गुप्ता यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे निखिल गुप्ता आता औरंगाबादचे नवे पोलिस आयुक्त असतील.
चिरंजीव प्रसाद यांना पुढील सहा महिन्यांमध्ये अतिरिक्त महासंचालक म्हणून पदोन्नती मिळणार असल्याने त्यांना कायम ठेवले जाईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्यांचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने महासंचालक कार्यालयाने त्यांची बदली केली आहे. दोन वर्षे अतिशय संयमी कामकाज करून त्यांनी येथील वातावरण शांत ठेवले. दोन वर्षांपूर्वी उफाळलेल्या दंगलीनंतर परिस्थिती शांत करण्यासाठी त्यांना पाठवले होते.
Post a Comment