जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा शुक्रवार



 माय अहमदनगर वेब टीम

शुक्रवार, 4 सप्टेंबर रोजी उत्तर भाद्रपदा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून शूल नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावातून 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा राहील.

राशीनुसार असा राहील तुमचा आजचा दिवस

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ३

चंगळवादी वृत्ती राहील. बऱ्याच दिवसांनी जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ६

व्यवसायातील वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल. कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमा-खर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. कायद्यात राहा.

मिथुन : शुभ रंग : मरून | अंक : १

अति धावपळ टाळा. हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील. आज जोडीदाराने दिलेले सल्लेही मोलाचे असतील.

कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ८

कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कदाचित चुकण्याची शक्यता आहे.

सिंह : शुभ रंग : निळा| अंक : ९

व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागेल. काही तत्त्वे गुंडाळून ठेवावी लागतील. डोके शांत ठेवण्याची गरज.

कन्या : शुभ रंग : नारिंगी| अंक : ७

वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. शेजारी कुत्सित नजरेने बघतील. गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.

तूळ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ५

एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज मित्रांकडून प्रोत्साहन मिळेल.

वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६

आज फक्त कष्ट करीत राहा, फळाची अपेक्षा मात्र उद्याच करा. आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील.

धनू : शुभ रंग : भगवा | अंक : ३

समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील. आज आपल्या मतावर ठाम राहता येईल.

मकर : शुभ रंग : केशरी | अंक : १

नोकरीच्या ठिकाणी आज कामाव्यतिरिक्त फार खोलात शिरू नका. वरिष्ठ जितके विचारतील तितकेच बोला.

कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ४

नोकरीत वरिष्ठांना काही सुचवण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. आपल्या अडचणी देवालाच सांगा.

मीन : शुभ रंग : जांभळा | अंक : २

गोडबोली माणसे भेटतील. नवीनच झालेल्या ओळखीत लगेच विश्वास ठेवू नका. झटपट लाभाचा मोह टाळा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post