पत्रकार स्व.पांडुरंग रायकर यांच्या घरी मा.प्रा. राम शिंदे साहेबांची सांत्वनपर भेट
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : टीव्ही 9 चे पत्रकार व हंगेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगरचे सुपुत्र स्व. पांडुरंग रायकर यांचे कोरोना मुळे पुणे येथे निधन झाले. स्व.पांडुरंग रायकर यांना वेळेत व्हेंटलेटर न मिळाल्यामुळे अहमदनगर जिह्याचा सुपुत्र व धाडशी पत्रकार यांचे निधन झाले आहे. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री ना.प्रा.राम शिंदे यांनी सांत्वनपर कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले तसेच 5 लाख रु. ची मदतीचा हात रायकर कुटुंबियाना दिला आहे.
भाजपा प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत (दादा) पाटिल यांच्याकडे पाठपुरावा करुन 5 लाख रु.चा धनादेश कुटुंबियांना मिळवून दिला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस (विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य) यांच्या सोबत चर्चा केली व स्व.पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबांना 50 लाख रु.चे वीमा कवच व सरकारी नोकरीत पत्नीचा समावेश व्हावा ही मागणी केली आहे.
येत्या अधिवेशनात ही मागणी करून ते कुटुंबियांना मिळवून देणारा आसल्याचे मजी मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी सांगितले आसल्याचे प्रा.शिंदे सांगितले.
भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत (दादा) पाटील यांनी 5 लाख रु.मदत देऊन शब्द पाळला. या प्रसंगी वेळेत उपचार न मिळाल्यामुळे उमद्या पत्रकाराचा जीव गेला आहे. या बाबत सरकार जबाबदार असून संबंधित यंत्रणा व चौकशी करून दोषींवर कारवाई करावी हि मागणी मा.प्रा.राम शिंदे यांनी केली.
या वेळी श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते ,भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष भाजप बाळासाहेब महाडिक सह भाजप नेते उपस्थित होते.
Post a Comment