नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेसने रणनीती ठरवली असून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीत विरोधकांतर्फे उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील स्ट्रॅर्टजी ग्रुपच्या डिजिटल बैठकीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या घटक पक्षांना आणि समान विचारसरणीच्या पक्षांना सोबत घेण्याचेही ठरले आहे. उमेदवार कुठल्या पक्षाचा असेल, कोण असेल यावर सहयोगी पक्षांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
अधिवेशनाला 14 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे, याच दिवशी ही निवडणूक होईल. संयुक्त जनता दलाचे राज्यसभा सदस्य हरिवंश नारायण सिंह यांचा कार्यकाळ संपल्यांतर हे पद रिक्त झाले आहे. दरम्यान, हरिवंश हे पुन्हा राज्यसभेवर निवडून गेले आहेत.
Post a Comment