गुरुवार 17 सप्टेंबर रोजी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शुभ नावाचा खास योग तयार होत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
मेष: शुभ रंग : आकाशी | अंक : २
दैनंदीन कामातही अडथळे येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. सत्संगाने मानसिक बळ मिळेल.
वृषभ: शुभ रंग : नारिंगी | अंक : ६
व्यवसायात भागिदारांशी सलोख्याचे संबंध राहतील.जोडीदाराशी सामंजस्य राहील. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील. प्रवास कंटाळवाणे होणार आहेत.
मिथुन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ९
कौटुंबिक स्तरावर आज काही मनासारख्या घटना घडणार आहेत. मुले अज्ञाधारकपणे वागतील. प्रेमवीरांनी मात्र आज तू नही तो और सही हेच धोरण ठेवावे.
कर्क : शुभ रंग : राखाडी | अंक : ७
तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होणार आहेत. प्रतिष्ठीतांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. मित्रांच्या मदतीस धाऊन जाणार आहात.
सिंह : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३
आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल. महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.
कन्या : शुभ रंग : निळा | अंक : १
नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. विरोधकांचा जोर आता कमी होईल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल.
तूळ : शुभ रंग : लाल | अंक : ४
शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने आज तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.
वृश्चिक : शुभ रंग : निळा| अंक : ३
उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. नोकरदारांना साहेबांच्या लहरी सांभाळाव्या लागतील. पत्नीच्याही लहरी सांभाळाल.
धनू : शुभ रंग : पांढरा | अंक : ४
तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. दुपारनंतर एखादी चांगली बातमी येईल. आज तुमचा ईच्छापूर्तीचा दिवस.
मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ८
आज महत्वाची कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी.थोडी मानसिक अस्वस्थता राहील. नोकरीत वरीष्ठांचे दडपण जाणवेल. कर्तव्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे.
कुंभ : शुभ रंग : केशरी | अंक : ५
कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर ते सुसंवादाने मिटू शकतील. प्रवासात काही नवे हितसंबंध निर्माण होतील. गृहीणींना थोरांचे मानपान सांभाळावे लागतील.
मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : २
आपले म्हणणे इतरांना पटावेच असा अट्टहास आज करून चालणार नाही. कुणालाही मोफत सल्लेवाटप करू नका. आज फक्त आपल्या ताटात बघुन जेवा.
Post a Comment