माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणावत व उर्मिला मातोंडकर यांच्यात ट्विटर वॉर सुरु आहे. त्यांच्यात हा वाद ड्रग्सच्या मुद्द्यावरुन सुरु आहे. एका वृत्तवहिनीशी बोलताना कंगनाने सनी लिओनीचे उदाहरण देऊन उर्मिला मातोंडकरवर टीका केली होती. यावर आता सनी लिओनीने इंन्स्टाग्रामवरुन फोटो पोस्ट करत अप्रत्यक्ष कंगनावर टीका केली आहे.
‘हे खूप मजेशीर आहे की ज्या लोकांना तुमच्याबद्दल फार कमी माहिती असते तेच लोक तुमच्याबद्दल सर्वांत जास्त बोलतात.’ हे लिहित सनीने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कंगनाने उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. तर उर्मिला यांनी मला जेव्हा प्रॉस्टिट्युट म्हटले होते तेव्हा फेमिनिझम कुठे गेला होता, असा सवाल कंगनाने नेटकऱ्यांना विचारला आहे.
Post a Comment