ऐश्वर्या राय 'या' शिक्षकाच्या होती प्रेमात!



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने आपल्या करिअरसोबत सर्वच नाती परिपूर्ण जपली आहेत. तिचे बॉलिवूड क्षेत्रातील करिअर लक्षणीय आहे. यासोबतच ती एक आदर्श मुलगी, सुन, चांगली पत्नी आणि समजूतदार आई ही नाती जपली आहेत. पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे, ऐश्वर्या राय कॉलेजमध्ये असताना  वर्गशिक्षकाच्या प्रेमात पडली होती. याबद्दलची माहिती ऐश्वर्या रायची कॉलेजची मैत्रीण शिवानीने सांगितले आहे.  

ऐश्वर्या रायची कॉलेजची मैत्रीण आणि ब्युटी आयकॉन शिवानी हिने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यामध्ये तिने सांगितले आहे की, 'कॉलेजच्या दिवसांत ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत होती. प्रत्येकाला तिची सुंदरता मोहून टाकत होती. पण ती भौतिकशास्त्राच्या (फिजिक्स) शिक्षकास इंम्प्रेस करत होती. शिक्षकांना पाहण्यासाठी ऐश्वर्या पहिल्या बेंचवर बसायची. प्रत्येक मुली आपल्या शिक्षकावर इंम्प्रेस होण्याची ही काय पहिली वेळ नाही, तर असे बऱ्याच वेळा झालेले असते.' 

यापुढे शिवानीने सांगितले आहे की, 'जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या अंतःकरणाने पसंत करत असल्यास तो त्या व्यक्तीजवळ राहण्यासाठी १०० कारणे देत असतो.'  

सोशल मीडियावर आजकाल प्रियजनांचे आपले प्रेम व्यक्त करणे खूप सोपे झाले आहे. पूर्वी लोकांना प्रेम व्यक्त करण्यायाठी वर्षानुवर्षे घ्यालवावे लागत होते. पण सध्या सोशल मीडियावरील रोमँटिक इमोजीद्वारे प्रेम व्यक्त केले जाते. यावरच आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या जातात.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post