माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. स्वतः गडकरी यांनी बुधवारी रात्री सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली. मंगळवारी रात्री थकवा आणि कमजोरी जाणवत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गडकरी यांनी कोरोनाची चाचणी केली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे.
कोरोनाची बाधा झाल्यानंतर गडकरी यांनी स्वतः ला विलग केले असून आपल्या संपर्कात जे लोक आले आहेत, त्यांनी सावध रहावे आणि प्रोटोकॉलचे पालन करावे, असे गडकरी यांनी म्हटले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला गेल्या सोमवारी सुरुवात झाली होती, या पार्श्वभूमीवर ते नुकतेच दिल्लीत आले होते.
Post a Comment