अनुराग कश्यपचे पायल घोषला प्रत्युत्तर, म्हणाला...



माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - अभिनेत्री पायल घोषने बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. तिच्या या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. आता अनुराग कश्यपने एका पाठोपाठ एक ट्विट करत आपल्यावरील आरोपाला उत्तर दिले़ आहे.

अनुराग म्हणतो की, क्या बात है, मला गप्प करण्यासाठी इतका वेळ घेतला. काही हरकत नाही. पण मला गप्प करण्यासाठी इतके खोटे बोललात की, दुस-या महिलांनाही यात ओढले. थोडी मर्यादा ठेवा मॅडम. मी फक्त एवढेच म्हणालो की, जे काही आरोप आहेत ते सगळे निराधार आहेत.

तो पुढे म्हणतो की, मॅडम दोन लग्न केलीत. तो गुन्हा आहे तर मान्य आहे. प्रेमही खूप केले, तेही मान्य करतो. मग माझी पहिली पत्नी असो, दुसरी पत्नी असो वा प्रेयसी किंवा मग त्या सर्व अभिनेत्री, ज्यांच्यासोबत मी काम केले. माझ्यासोबत काम करणारी मुलींची वा महिलांची संपूर्ण टीम शिवाय ज्या महिलांना मी फक्त भेटलो, सर्वांवर मी प्रेम केले. एकांतात वा सर्वांसमोर.

तुम्ही म्हणता तसे मी ना वागतो, ना सहन करतो. बाकी सगळे पाहतातच तुमच्या व्हिडीओमध्येही किती सत्य आहे, ते दिसतेच. बाकी तुम्हाला केवळ  प्रेम आणि आशीर्वाद. तुमच्या इंग्रजी प्रश्नाचे उत्तर हिंदीत देण्याबद्दल माफी, असा खोचक टोमणाही अनुरागने पायलला लगावला आहे.

दरम्यान, अभिनेत्री पायल घोष हिने अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. अनुराग कश्यपने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आपल्यावर जबरदस्ती केली, असे म्हणत पायल घोष हिने कश्यपवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पंतप्रधान कार्यालयाला टॅग करत तिने ट्विटरद्वारे ही मागणी केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने याची दखल घेतली आहे.

अनुराग कश्यपने आपल्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मदत करा आणि या सर्जनशील माणसामागील खरी प्रतिभा देशाला पाहू द्या. आपल्याला माहीत आहे की, यामुळे आपले नुकसान होऊ शकते. आपली सुरक्षादेखील धोक्यात आहे. कृपया मदत करा, असे ट्विट पायल घोष हिने केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post