मंत्री विश्वजीत कदम यांना कोरोनाची लागण

 

माय अहमदनगर वेब टीम

सांगली - मंत्री विश्वजीत कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. धावपळीच्या कारभारात योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेत होतोच. परंतु अखेर मला कोरोना संसर्ग झालाच! थोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने काल चाचणी करून घेतली. आज त्याचा अहवाल आला आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालो. अशी माहिती मंत्री कदम यांनी दिली आहे. 

याचबरोबर त्यांनी गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया चाचणी करून घ्यावी, अशी विनंती केली आहे. माझ्या तब्येतीला धोका नाही. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घरीच विलगीकरणात मी उपचार घेत आहे. माझे कार्यालय नियमित सुरू असून मी देखील फोनद्वारे उपलब्ध राहण्याचा प्रयत्न करीन, अशी माहिती कदम यांनी दिली आहे.

माझा पलूस कडेगांव मतदारसंघ, सांगली जिल्हा, महाविकास आघाडी सरकारच्या योजना, कोरोना रोखण्यास उपाययोजना, मंत्रालय बैठका, भंडारा पालकमंत्री या नात्याने पूरपरिस्थिती दौरे, भारती विद्यापीठ कामकाज यासाठी कोरोनातून बरा झाल्यावर सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन, असा विश्वास मंत्री कदम यांनी दिला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post