निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड!



माय अहमदनगर वेब टीम
गरमी आणि घामामुळे शरीराला खाज येणं किंवा त्वचेवर रॅशेज येणं साधारण गोष्ट आहे. पण खाज आल्यावर झोपेत चुकूनही नखं लागलं तर समस्या वाढते. त्यातही सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळा हा ऋतू सर्वांनाच आवडतो पण ऋतू बदलताच आपल्याला स्किन केयर रुटीनमध्येही बदल करणं गरजेचं असतं. ओलसर आणि दमट हवामान आपल्या त्वचेचं नुकसान करू शकतं. हाय ह्युमिडीटीमुळे त्वचेला खाज सुटते आणि चेहऱ्यावर पिंपल्स देखील येतात. म्हणूनच पावसाळ्यातच काय तर कोणत्याही ऋतुमध्ये तुमच्या त्वचेचं संरक्षण करेल आणि कोणतेही साई़ड इफेक्ट्स होणार नाहीत असं नैसर्गिक ऑईल ब्लेंड घरच्या घरी तयार करण्याची पद्धत आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. 

या नैसर्गिक सामग्री पासून तयार केल्या जाणा-या ऑईल ब्लेंडचा त्वचेवर वापर केल्याने तुमची स्किन केमिकलमुक्त आणि इतर त्वचेच्या इन्फेक्शन्स पासून आपला बचाव करु शकते. सुदंर, मुलायम, उजळदार त्वचा मिळावी यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. कित्येक मुली तर यासाठी महागड्या पार्लर ट्रिटमेंट्स आणि प्रोडक्ट्सचा वापर देखील करतात. पण हे केमिकलयुक्त प्रोडक्टस काही काळाकरता सौंदर्यांत भर घालत असले तरी काही वर्षांनी यामुळे त्वचेला हानी पोहचते. त्यामुळे जितकं शक्य असेल तितकं घरगुती आणि नैसर्गिक सामग्रीपासून तयार होणा-या क्रिम्स व ऑईल्सचा त्वचेवर वापर करावा. यामुळे स्किन इन्फेक्शनही होत नाही व त्वचा निरोगी देखील राहते.
घरगुती ऑईल ब्लेंडसाठी लागणारी सामग्री


घरच्या घरी झटपट आणि नैसर्गिकरित्या ऑईल ब्लेंड तयार करण्यासाठी तुम्हाला तीन तेलांची गरज असते. यामध्ये तुम्हाला कोकोनट वर्जिन ऑईल (नारळाचे तेल), ऑल्मंड ऑईल (बदामाचे तेल) आणि क्लोव ऑइल (लवंगाचे तेल) या तेलांची आवश्यकता भासते. ही तिन्ही तेलं कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतात. ही तिन्ही तेलं एका ठराविक प्रमाणात तुम्हाला एकजीव करायची आहेत. खाली दिलेली कृती फॉलो करुन बनवा नैसर्गिक ऑईल ब्लेंड!

या तेलांचे खास गुणधर्म काय?


नारळ तेल :- त्वचेला नैसर्गिकरित्या मुलायम करण्यास, ड्रायनेसपासून अर्थात कोरडेपणापासून बचाव करण्यास आणि पेशींना पोषक घटक पुरवण्यास नारळाचे तेल सर्वात लाभदायक पर्याय आहे. हे एखाद्या अ‍ॅंटीबॅक्टेरियल नैसर्गिक औषधाप्रमाणे कार्य करते.
बदामाचे तेल :- नैसर्गिकरित्या त्वचेचा रंग उजळवण्यास, काळे गडद डाग मिटवण्यास आणि त्वचा मुलायम बनवण्यासाठी बदामाचे तेल फारच उपयुक्त ठरते. हे तेल आपल्या त्वचेला डिप नरिशमेंट देण्याचं कार्य करतं.
लवंगाचे तेल :- हे तेल अ‍ॅंटीफंगल आणि अ‍ॅंटीअअ‍ॅलर्जिक असतं. तसेच हे तेल कोणत्याही प्रकारच्या पैथोजेन्स (बैक्टीरिया, फंगस आणि हानिकारक माइक्रोब्सला) आपल्या स्किनवर अ‍ॅक्टिव होऊ देत नाही.
या कारणामुळेच तुम्ही त्वचेशी निगडीत कोणत्याही संक्रमणाच्या विळख्यात आला तर हे नैसर्गिक तेल हे संक्रमण रोखण्यास प्रभावी ठरतं. सोबतच स्किनला डिफेन्स मेकॅनिजमला अधिक मजबूत बनवण्याचं काम करतं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post