संसद अधिवेशनात सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवरील स्थिती म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नासह देशाची अर्थव्यवस्था, राज्यांना जीएसटी नुकसानभरपाई आणि कोविड-१९ ची स्थिती आदी प्रश्नांवरून संसदेत सरकारला एकत्रितपणे घेरण्याची योजना विरोधी पक्षांमार्फत आखली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील संयुक्त रणनीती ठरविण्यासाठी विविध विरोधी पक्षांचे नेते या आठवडाअखेरीस एक बैठक घेण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे.


 
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या रणनीती गटाची बैठक आज बोलावली आहे. संसदेत सरकारला घेरण्यासाठी विविध समविचारी पक्षांनी एकमेकांसमवेत काम के ले पाहिजे, असे विरोधी पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या रणनीती गटाची एक बैठक झाली त्यामध्ये संसदेत कोणते प्रश्न उपस्थित करावयाचे त्यावर चर्चा झाली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post