TikTok ची अमेरिकेतील मालकी ‘या’ कंपनीकडे?



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - चीनी कंपनी Byte Dance चे शॉर्ट व्हिडिओ ॲप Tik Tok चे मालकी हक्क मिळवण्यासाठी शर्यत लागली होती. यात अमेरिकेची दिग्गज IT कंपनी मायक्रोसॉफ्टचे नाव आघाडीवर होते. मात्र, अचानक मायक्रोसॉफ्टने या शर्यतीतून माघार घेतली. त्यामुळे Tik Tok च्या खरेदीसाठी Oracle ही कंपनी सरसावली असून हा व्यवहार जवळपास पक्का झाल्याची माहिती रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या सूत्रांकडून मिळते आहे. 

Oracle सोबत Tik Tok ची डील...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनची Byte Dance चा अमेरिकेतील कारभार विकण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला होता. त्यामुळे Byte Dance ची अमेरिकेत Tik Tok विक्रीसाठी Oracle आणि मायक्रोसॉफ्ट या दोन कंपन्यांशी चर्चा सुरू होती. मात्र, मायक्रोसॉफ्टने रविवारी (दि. १४) Byte Dance ने आमची ऑफर धुडकावल्याची माहिती दिली. 

Oracle-Tik Tok मधील डील काय आहे?

मायक्रोसॉफ्ट सोबतची डील अयशस्वी झाल्यानंतर Byte Dance ने Oracle शी बोलणी केली. यात सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या करारान्वये Oracle ही कंपनी Byte Dance ची तंत्रज्ञ पार्टनर कंपनी असणार आहे. तसेच अमेरिकेतील TikTok यूजर्सच्या डेटाचे व्यवस्थापन Oracle कडून केले जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, Oracle कंपनी TikTok च्या अमेरिकेतील कारभारात हिस्सा मिळवण्याच्या तयारीत आहे. तसेच Byte Dance चे काही मोठे गुंतवणुकदार जसेकी General Atlantic आणि Sequoia यांनाही TikTok च्या अमेरिकेतील कारभारात अल्प भागधारक बनवले जाईल. 

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मंजुरीची प्रतिक्षा...

दरम्यान, Byte Dance आणि Oracle यांच्यात झालेल्या डीलला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मंजुरी देण्यात येणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेच्या कंपनीनेच Tik Tok चे अधिग्रहण करायला हवे असे ट्रम्प यांचे मते असल्याचे सूत्रांनी सांगीतले. अमेरिकेतील परकीय गुंतवणुक समिती Byte Dance आणि Oracle यांच्यातील खरेदी-विक्री व्यवहाराच्या चर्चेवर लक्ष ठेवून आहे. Byte Dance आणि Oracle ने अद्यापही दोघांमधील डील विषयी आधिकृतरित्या कुठही घोषणा केलेली नाही. तसेच व्हाइट हाउसने यावर कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  अमेरिकेत Tik Tok ची डाउनलोड संख्या १७.५ कोटी आहे. तर जगभरात एक अब्ज लोगों Tik Tok चा करतात. 

अमेरिकेकडून Tik Tok वर अनेकवेळा निशाणा साधला गेला आहे. TikTok आपल्या युजर्सचा डेटा चीनला देतो असा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला आहे. मात्र, या TikTok ने अमेरिकेच्या आरोपाचे खंडन केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post