जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

 


माय अहमदनगर वेब टीम

5 सप्टेंबर रोजी रेवती नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे प्रजापती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. जॉब आणि बिझनेसमधील अडचणी समाप्त होऊ शकतात. कामातील अडथळे दूर होण्यास मदत होईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : पांढरा | अंक : ८

काही अत्यावश्यक खर्च हात जोडून उभे असतील.घरात थोर मंडळी आपलेच खरे करतील. कमी बोला.

वृषभ: शुभ रंग : तांबडा | अंक : ४

व्यापार-उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल.काही अपुरे व्यवहार पूर्ण होतील. काही दुरावलेली नाती जवळ येतील. संततीचे विवाह जुळतील.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६

कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाच्या अपेक्षा वाढतील. स्वप्नरंजन सोडून कृतीस प्राधान्य द्याल.

कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : ७

कार्यक्षेत्रात अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. हाताखालच्या मंडळींत मिळून मिसळूून राहावे.

सिंह : शुभ रंग : मरून|अंक : ९

आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करूच नका. हितशत्रू सक्रिय अाहेत. स्वावलंबनाने यश सोपे होईल.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ६

घराबाहेर आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.

तूळ : शुभ रंग : आकाशी|अंक : ८

आज काही मान-अपमानाच्या प्रसंगास तोंड द्यावे लागेल. संध्याकळी डाॅक्टरांच्या भेटीचे योग दिसतात.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ४

नोकरदारांना आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. नोकरीच्या ठिकाणी नियम तंतोतंत पाळा.

धनु : शुभ रंग : भगवा|अंक : ३

शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय चांगले चालणार आहेत. आज विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद राहील.

मकर : शुभ रंग : पिवळा|अंक : ५

कार्यालयीन कामासाठी प्रवास होतील. घराबाहेर डोके शांत ठेवा. गृहिणींना अजिबात उसंत मिळणार नाही.

कुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : १

तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मन:स्थितीही चांगली राहील.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : २

आज तुमचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल.शब्दांचा वापर जपून करा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post